Saturday, 23 July 2016

Igatpuri




Igatpuri is a town and a Hill Station municipal council in Nashik District in the Indian state of Maharashtra. It is located in the Western Ghats. Igatpuri railway station lies in Nashik District between Mumbai and Nashik Road on the Central Railway. Igatpuri is known for Vipassana International Academy, where ancient technique of meditation is taught called Vipassana. Trains on this route usually change locomotives on this stop and also change the guards and drivers. The place is one of the best places to visit in Maharashtra in monsoon. It is a hill station on busy Mumbai-Agra NH-3 only 45 km from Nasik and 130 km from Mumbai.

Igatpuri is a major railway station with all trains stopping for 20 minutes as there is a change of locomotive engine owing to the electric current (AC/DC) running the engine. There is a major presence of the Indian Railways within this small town.

This is the station from where 25 KV AC traction on OHE begins for CR trains starting from Mumbai CST.

The station is famous for its scenic surroundings, wada pao and idlis sold by vendors to commuters traveling in the train. The exit of Igatpuri railway station signals the proximity of Mumbai on down route.

Holy Family Convent High School is the oldest English medium school run in the town. Other English school "Wonderland High School & Jr College". There's an Arts, commerce & Science College.

Igatpuri is surrounded by the highest peaks in Sahyaadri i.e. Western Ghats, most of them are forts built in Satavahana dynasty. It's heavenly for trekkers and hikers, Most Indian (Hindi) movie outdoor scenes specially songs are shot in Igatpuri region. Igatpuri is a place of significance in terms of Vipassana meditation. The International Centre for Vipassana meditation called Dhammagiri, supposedly the largest Vipassana Center, is located here.[1][2] This region consists of those mountains which are accessed by trains going from Mumbai CST to Kasara and Igatpuri. Local trains only go up to Kasara, and don't climb the Thal Ghat from Kasara to Igatpuri. Hence to go to Igatpuri, one has to either take a long distance train or reach Kasara by a suburban train and then take a bus uphill.

For Igatpuri photography documentaries follow Instgram Igatpuri

Accessibility
Igatpuri is well connected by rail and road. By NH-3 to Agra and by, Central Railway to Mumbai, Howrah, Guwahati, New Delhi, etc. It is a major railway station, As Loco Changes are made here for trains from and to Mumbai.

Tourism
Tourism is the most significant segment of the Igatpuri's economy. Following are the places most visited by tourists :
Bhatsa River Valley: The Bhatsa River valley is situated at the end of the Thal Ghat, just before entering Igatpuri from Mumbai. The valley lies in the basin of the majestic Bhatsa River. The valley is a picturesque spot with lush vegetation and majestic rocks formed by the river that runs through it.
Arthur Lake: A few km from Igatpuri, lies a huge and placid Arthur Lake, set like a huge jewel amidst the dense greenery. The lake is formed by the waters of the Pravara River in the Bhandardara region.
Kalsubai Peak About 35 km from Igatpuri is the highest peak in the sahyadri ranges.
Amruteshwar Temple: Built in 11th century AD, it is dedicated to Lord Shiva. Constructed in a distinct Hemadpanti style, the temple is surrounded by lush green fields and Mount Kalsubai the highest mountain in Maharashtra. From here a further excursion leads to the Ratangad Fort. One can access this temple by road or an 8 km boat ride on Arthur Lake.

View of Myanmar Gate, Dhamma Giri, Igatpuri.
Dhamma Giri Meditation Centre: Founded by S.N.Goenka, Dhammagiri is a meditation centre offers courses in Vipasana (insight meditation) a technique taught by the Buddha in India, 2,500 years ago. The large Golden Pagoda, the central theme of Dhammagiri serves as a landmark for Igatpuri. The centre attracts a lots of people from various parts of India as well as abroad. More on Dhammagiri , visit at www.giri.dhamma.org

Ghatandevi Temple: Just ahead of Igatpuri, after crossing the camel Valley, comes across a small road, which leads to the Ghatandevi temple. According to the locals belief, Ghatandevi is the Protector of Ghats. The mountains of Durrar Utvad, Trimak and Harihar forms a spectacular backdrop. Behind the temple lies the Tringalwadi Fort.

Igatpuri Cemetry It lies on a hillock, North of the town.Soldiers died while fighting the great war in India are buried here.

Tringalwadi Fort: It is situated at an altitude of 3,000 feet above the sea level. Since it is located very high, the fort offers picturesque scenery of the whole locality, especially Kulang and Kalsubai mountain ranges. The fort attracts trekkers also. The top of the fort is shaped like a Turban. A temple dedicated to lord Hanuman is nearby. An architectural marvel, the fort can be accessed through a narrow pathway, down to the Tringalwadi Lake. Just a few km away from Tringalwadi Lake is Talegaon Lake formed by the small Talegaon Dam.

Camel Valley: A few metres away from Bhatsa river Valley, on the right is the camel valley. On the other side of the valley is a waterfall formed by the rain waters and one have to walk over and look down to find a slop that falls over 1, 000 ft. The waterfall is the chief attraction of this place.

The Five Waterfalls
A little further from Ghatandevi, the rough road leading to the railway line begins. Across the railway line, while climbing down, falling one below the other, are five waterfalls that form which are main attraction for tourists in Igatpuri.

Uploaded by Picnic Plans



Thursday, 14 July 2016

भैरवगड Bhairavgad Fort

भैरवगड Bhairavgad Fort – हा गड वनदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
भैरवगड हा कोयनानगरच्या विभागात मोडणार किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या सलग रांगेपासून दुरावलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर बसवण्यात आली आहेत. त्यामुळे माणसां वावर तसा कमीच. पायथ्याशी गावं गाठण्यासाठी एस.टी. चांगली सोय आहे.
इतिहास : इतिहासात या गडाचा उल्लेख कोठेही नाही. मात्र या गडाचा वापर केवळ टेहळणी साठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : भैरवगडावर पाहण्यासारखे फार काहीच नाही. गडावर एक मंदिर आहे. मंदिर फारच प्रशस्त आहे.मंदिर मजबूत आणि कौलांनी शाकारलेले आहे.मंदिरात भेरी देवी, श्री तुळा देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २-३ फुटी मूर्ती आहेत. या लाकडी मंदिरावर बरेसचे कोरीव काम आढळते. मंदिरासमोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. तसेच समोर दोन तीन खांब देखील दिसतात. समोरच शंकराचे मंदिर सुद्धा आहे.मंदिरासमोर खाली उतरणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तीन बुरूज लागतात. येथून पुढे गेल्यावर एक ढासळलेल्या अवस्थेतील दरवाजा आहे. या दरवाजतून पुढे गेल्यावर डावीकडे वळावे. समोर असणाऱ्या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस यावे. येथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही टिकते. याच्यापुढे पाहण्यासारखे काहीच नाही. लांबवर पसरलेलं कोयनेच दाट जंगल दिसते. गडमाथा तसा अरुंदच आहे. त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. मंदिराच्या दिशेने तोंड करून उभे राहिल्यास उजवीकडे दरीत उतरणाऱ्या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे. येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते.
गडावर जाण्याच्या वाटा : भैरवगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. एक थेट कोकणातून वर चढते तर दुसरी हेळवाकच्या रमघळीत पासून गडावर जाते. तिसरी गव्हारे गावातून आहे.
१. दुर्गवाडी मार्गे : या मार्गे भैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळून गाठावे. चिपळूण करून दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८:०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणतः १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणाऱ्या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही.
२. हेळवाकची रामघळ मार्गे : हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण-कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर हेळवाक नावाचा फाटा लागतो. तेथे उतरून २ तासांत रामघळ गाठावी. रामघळीतून वर जाणारा रस्ता पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आप्ण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाटा जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाड्या घेऊन जाणे आवश्यक आहे.
३. गव्हारे मार्गे : गडावर जाण्यासाठी गव्हारे गावातूनही वाट आहे. दुर्गवाडी गावाच्या अगोदर गव्हारे गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचाव. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणाऱ्या वाटेस मिळते.
राहण्याची सोय : गडावरील मंदिरात २० जणांना राहता येते.
जेवणाची सोय : आपण स्वतहः करावी.
पाण्याची सोय : बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास – दुर्गवाडी मार्गे. ७ तास -रामघळी मार्गे
सूचना : पावसाळ्यात जळवांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो. यापासून बचाव करण्यासाठी मीठ सोबत घेऊन जाणे.

भैरवगड Bhairavgad Fort

भैरवगड Bhairavgad Fort – हा गड वनदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
भैरवगड हा कोयनानगरच्या विभागात मोडणार किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या सलग रांगेपासून दुरावलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाही. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर बसवण्यात आली आहेत. त्यामुळे माणसां वावर तसा कमीच. पायथ्याशी गावं गाठण्यासाठी एस.टी. चांगली सोय आहे.
इतिहास : इतिहासात या गडाचा उल्लेख कोठेही नाही. मात्र या गडाचा वापर केवळ टेहळणी साठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : भैरवगडावर पाहण्यासारखे फार काहीच नाही. गडावर एक मंदिर आहे. मंदिर फारच प्रशस्त आहे.मंदिर मजबूत आणि कौलांनी शाकारलेले आहे.मंदिरात भेरी देवी, श्री तुळा देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २-३ फुटी मूर्ती आहेत. या लाकडी मंदिरावर बरेसचे कोरीव काम आढळते. मंदिरासमोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो. तसेच समोर दोन तीन खांब देखील दिसतात. समोरच शंकराचे मंदिर सुद्धा आहे.मंदिरासमोर खाली उतरणाऱ्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तीन बुरूज लागतात. येथून पुढे गेल्यावर एक ढासळलेल्या अवस्थेतील दरवाजा आहे. या दरवाजतून पुढे गेल्यावर डावीकडे वळावे. समोर असणाऱ्या टेकाडाला वळसा मारून गडाच्या मागील बाजूस यावे. येथे पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही टिकते. याच्यापुढे पाहण्यासारखे काहीच नाही. लांबवर पसरलेलं कोयनेच दाट जंगल दिसते. गडमाथा तसा अरुंदच आहे. त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. मंदिराच्या दिशेने तोंड करून उभे राहिल्यास उजवीकडे दरीत उतरणाऱ्या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे. येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते.
गडावर जाण्याच्या वाटा : भैरवगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. एक थेट कोकणातून वर चढते तर दुसरी हेळवाकच्या रमघळीत पासून गडावर जाते. तिसरी गव्हारे गावातून आहे.
१. दुर्गवाडी मार्गे : या मार्गे भैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळून गाठावे. चिपळूण करून दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८:०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणतः १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणाऱ्या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही.
२. हेळवाकची रामघळ मार्गे : हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण-कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर हेळवाक नावाचा फाटा लागतो. तेथे उतरून २ तासांत रामघळ गाठावी. रामघळीतून वर जाणारा रस्ता पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आप्ण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाटा जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाड्या घेऊन जाणे आवश्यक आहे.
३. गव्हारे मार्गे : गडावर जाण्यासाठी गव्हारे गावातूनही वाट आहे. दुर्गवाडी गावाच्या अगोदर गव्हारे गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचाव. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणाऱ्या वाटेस मिळते.
राहण्याची सोय : गडावरील मंदिरात २० जणांना राहता येते.
जेवणाची सोय : आपण स्वतहः करावी.
पाण्याची सोय : बारमाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : ३ तास – दुर्गवाडी मार्गे. ७ तास -रामघळी मार्गे
सूचना : पावसाळ्यात जळवांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो. यापासून बचाव करण्यासाठी मीठ सोबत घेऊन जाणे.

पांडवगड किल्ला

पांडवगड किल्ला Pandavgad Fort – हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
वाई गावाला खेटूनच उभा असलेला पांडवगड त्याच्या विशिष्ट अशा रचनेमुळे नेहमी लक्ष वेधून घेतो. माथ्यावर कातळ भिंतिचा मुकुट परिधान केलेला हा किल्ला वाईहून सहज पायी जाता येण्यासारखा आहे. वाई मांढरदेव मार्गावर हा गड आहे.
इतिहास : चालुक्यांच्या राज्यांनतर शिलाहारांनी पन्हाळा -कोल्हापूर दख्खन या भागावर राजय चालविले. १९९१-९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला से पुरावे आढळतात. हा किल्ला प्रथम आदीलशाहीत होता. ७ ऑक्टोंबर १६७३ मध्ये मराठ्यांनी तो जिंकला. पुढे १७०१ औरंगजेबाने हा किल्ला घेतला. त्यानंतर शाहू महाराजांनी किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी पांडवगड आपल्या ताब्यात आणला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकणे : मेणवली गावातून आपण पहिल्या माचिवर गेलो असता तेथून जवळच भैरोबाचे मंदिर लागते. त्याच्याबाहेरच काही प्राचीन मूर्तीचे अवशेष आहेत. तेथे कातळात कोरलेल्या काही पायऱ्या आहेत. येथून साधारण १५ ते २० मिनिटांवर गडाचे प्रवेशद्वार लागते. कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या साह्याने थोडे वर गेल्यावर आपण माची सारख्या भागात प्रवेश करतो. गडाच्या उत्तरबाजुला काही टाकी आढळतात समोरच पारश्याचा एक बंगला आहे. बंगल्या समोरच कुंपण घातलेले एक टाके आहे. येथून आपण बालेकिल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यावर वाटेत काही अवशेष दिसतात. तर एका ठिकाणी सलग सहा पाण्याची टाकी आढळतात. त्यापैकी एक पाण्याचं टाकं मोठे असून त्याच्या आतील बाजूस खांब देखील आहेत. गावऱ्यांच्या मते टाक्यातील पाण्याचा रंग वेगवेगळा होता. येथूनच एक पायवाट बालेकिल्ल्याकडे जाते. बालेकिल्ल्याला काहीश्या पायऱ्या व तटबंदी शिल्लक आहे. डावीकडे गेल्यावर एका उघड्या मंदिरात दगडात कोरलेला मारुतीची मूर्ती दिसते. पुढे काही अंतरावर पांडजाइ देवीचे मोडकळीस आलेले मंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर एक तळे आहे. आता मात्र सुकलेल्या अवस्थेत आहे. बालेकिल्ल्याच्या दक्षिणेस इमारतीचे काही अवशेष दिसतात. या इमारतीचा पाया ३० फुट रुंद असा आहे. तसे पाहिले तर बालेकिल्ला फारच छोटा आहे. गडाच्या उत्तरेकडे थोडेसे पठार आहे. लोहगडाच्या विंचुकाठ्या सारखा थोडा भाग पुढे आला आहे. गडाच्या पूर्वेकडे एक वाटा धावडी गावात उतरते. याच गावात जवळ पांडवलेणी आहेत. आपण जेव्हा मेणवली गावाकडून गडावर येतो. तेव्हा जे पहिले प्रवेशद्वार आहे तेथून गडाचा संपूर्ण घेरा ही खाजगी मालमत्ता आहे. या मागची घटना अशी की पांडवगड कोण्या एका सरदारची मालमत्ता होती यानंतर मॅपको कंपनीने तो विकत घेतला. सध्या श्री. सर्वोदय वाडीया नावाचे गृहस्थाने गडावर एक फलक देखील लावला आहे. त्याद्वारे गडावर मद्यप्राशन, धुम्रपान मादक पदार्थ सेवनास बंदी घातली आहे. सर्व गड फिरण्यास दोन तास पुरतात.
गडावर जाण्याच्या वाटा :
१. वाई ते मेणवली सतत गाड्यांची ये जा चालू असते. मेणवली गावा जवळून धोम धरणाचा जो कालवा गेला आहे तो पार केल्यावर समोरच पांडवगड दिसू लागतो. समोर असणाऱ्या पठारावर गेल्यावर दोन वाटा फुटतात. येथपर्यंत येण्यासाठी गावातून अर्धातास पुरतो. दोन वाटांपैकी एक वाट लांबची आणि वळसा घालून जाणारी आहे. पहिल्या वाटेन पायथ्यावरून गडावर जाण्यास १ तास पुरतो. या पठारावर कोळी लोकांची वस्ती आहे.
२. दुसरी वाट गुंडेवाडी गावातून वर जाते. वाई धावडी मार्गे गुंडेवाडी गावातून वर पोहचावे. गुंडेवाडी गावातून चांगली मळलेली आणि काही ठिकाणी अलिकडेच बांधलेल्या पायऱ्यांची सोपी वाट आहे. या वाटेने गडमाथा गाठण्यास २ तास पुरतात.
श्री सर्वादय वाडीया यांच्या घराबाहेरील शेड मध्ये १० जणांना राहता येते. व पांडजाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांना राहता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी मेणवली मार्गे १ तास, धावडी मार्गे २ तास लागतात.

Tuesday, 12 July 2016

अजिंक्यतारा किल्ला

अजिंक्यतारा किल्ला Ajinkyatara Fort – ३०० मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
अजिंक्यतारा हा किल्ला ‘सातारचा’ किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. सातारा शहरामंध्ये कुठेही उभे राहिले असता नजरेस पडतो. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. येथील किल्ल्यांचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर डोंगर धारेवरून जाण्यासारखी परिस्थिती या भागात नाही. येथील किल्ल्यांचि सरासरी उची कमीच आहे. अजिंक्यताऱ्याची उंची साधारणतः ३०० मीटर असून ती दक्षिणोत्तर ६०० मीटर आहे.
इतिहास : साताराचा किल्ला (अजिंक्यतारा ) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा, साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज (दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला.
इ.स. १६९९ रोजी औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रील १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू मोगलांवर ढासळला व दीडा हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले.
किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा, ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्यांचे नामांतर केले अजिंक्यतारा! पन ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसऱ्या शाहुच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इंग्रजांकडे गेला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावा प्रवेश करतो त्या मार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोनदरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्हीबुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाटा दिसते व ‘मंगळादेवी मंदिराकडे’ असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासाळलेला राजवाडा तसेच कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे.
मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात कशातही पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जगड हा परिसर दिसतो. संपूर्ण गड बघण्यासाठी दीड तास लागतो.
गडावर जाण्याच्या वाटा : अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एस.टी. स्थानकावरून अदालत वाड्या मार्गे जाणारी कोणतीही गाडी पकडावी आणिअदालत वाड्यापाशी उत्रावे. सातारा ते राजवाडा असी बससेवा दर १० -१५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने जाणाऱ्या थेट वाटेने आपण गडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागतो व येथून गाडी रस्त्याने १ कि.मी. चालत गेल्यावर आपण थेट दरवाज्यापाशी पोहचतो. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड गाठण्यास साधारण १ तास लागतो.
राहण्याची सोय : गडावरील हनुमानाच्या मंदिरात १० ते १५ जणं राहू शकतात.
जेवणाची सोय : जेवणाची व्यवस्था आपणच स्वतः करावी.
पाण्याची सोय : उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात गडावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : साधारणतः १ तास (साताऱ्यापासून)

महिमानगड किल्ला

महिमानगड किल्ला Mahimangad Fort – ३००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा – फलटण डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
किल्ला मान तालुक्यात दहिवडी नावाच्या खेड्याच्या पश्मिमेला ५.५० मैलांवर शिद्रिबुद्रुक खेड्यात येतो. सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा कमी पावसाचा त्यामुळे दुर्भिक्ष याच्या पाचवीला पुजलेलं.
इतिहास : साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता शिवरायांनी जे किल्ले घेतले त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. प्रवेशवद्वारतून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे बिनछप्पराचे देऊळ दिसते. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पायऱ्या दिसतात. येथून थोडे पुढे गेल्यावर समोरच पाण्याचे सुंदर तलाव आहे. तलाव बऱ्यापैकी खोल आहे. या तलावाला बारामही पाणी असते. त्याच्याच बाजूला वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. गडाच्या ईशान्येस गडाची एक सोंड लांबवर गेलेली दिसते. या सोंडेला पकडून एक डोंगररांग पुढे गेलेली आहे. या सोंडेवर थोडेफार वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजूला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे. गड फिरण्यास साधारण अर्धातास पुरतो. किल्ल्यावरून वर्धनगड, ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा:
१. महिमानगड गाव मार्गे :किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा सातारा – पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुढे १२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या महिमानगड फाट्यावरून पुढे जातो. दहिवडी कडून साताऱ्याकडे येणाऱ्या रस्त्यावरून सुद्धा महिमानगड फाट्यावर उतरता येते. महिमानगड फाट्यावरून महिमानगड गावात जाण्यास वीस मिनिटे लागतात. फलटण-दहिवडी मार्गे सातारा गाडी किंवा सातारा पुसेगाव मार्गे पंढरपूर जाणारी गाडी देखील महिमानगड फाट्यापाशी थांबते. महिमानगड गावातूनच किल्ल्यावर एक पायवाट जाते. या वाटेने गड गाठण्यास २५ मिनिटे पुरतात. गडावर चढतांना त्याच्या अभेद्यपणा प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत असतो. गावाच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालया समोरूनच एक वाटा गडावर जाते. वाट थेट प्रवेशद्वारातच घेऊन जाते. प्रवेशद्वाराचे बुरूज आजही चांगल्या अवस्थेत आहेत.
राहण्याची सोय किल्ल्यावर नाही. किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी. किल्ल्यावर जाण्यासाठी महिमानगड गावातून अर्धातास लागतो. येथे सर्व ऋतुत जाता येते.

कल्याणगड किल्ला

कल्याणगड किल्ला Kalyangad Fort – ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. साताऱ्यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला आपन पाहून येऊ शकतो. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहे. या किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे चढण्यास सर्वात सोपा. संपूर्ण प्रदेश ऊसामुळे सधन झालेल्या शेतकऱ्यांचा प्रदेश. त्यामुळे एस.टी.ची सोय देखील उत्तम प्रकारची आहे.
इतिहास : कल्यानगडाचेच दुसरे नाव म्हणजे ‘नांदगिरीचा किल्ला’ सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इ.स. ११७८ ते इ.स. १२०९ या कालावधीत बांधला गेला असावा. शिलाहाराच्या सापडलेल्या अनेक ताम्रपटावरून असे दिसते की शिलाहार राजांनी जैन लोकांना अनेक दानधर्मे केली, आणि कल्याणगडावरील गुहेत असणाऱ्या पार्श्वनाथाच्या मूर्तीवरून ह गडा शिलाहारांनी बांधला असावा हे सिद्ध होते. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला. त्यातच कल्याणगदाचा देखील समावेश होता. पुढे शिवकालानंतर याचा सर्व कारभार प्रतिनिधींकडे सोपवला गेला. पुढे पेशव्यांकडे व प्रतिनिधींमध्ये वितुष्ट निर्माण झाले आणि हा किल्ला पेशव्यांकडे आला. पेशव्याने इ.स. १८१८ मध्ये जनरल प्रिझलरने हा किल्ला बिर्टिशांच्या ताब्यात घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्याअर चढताना दोनदरवाजे लागतात. पहिला दरवाजा हा उत्तराभिमुख आहे यातून आत शिरल्यावर समोरच एक मंदिर दिसते. मंदिराच्या बाजूने तटबंदीच्या अनुरोधाने एक वाट खाली उतरते. या वाटेने खाली उतरल्यावर समोरच एक भुयार लागते. हे कल्याणगडावरील सर्वटा प्रेक्षणीय स्थान आहे. हे भुयार जवळजवळ ३० मीटर आत आहे. भुयारात जाणाऱ्या वाटेच्या दोन्ही बाजूला १२ महिने पाणी असते. वाटेच्या आजुबाजूला लोखंडी सळ्या लावलेल्या आहेत. भुयाराच्या शेवटी नवव्या शतकात घडवलेली पार्श्वनाथांची मूर्ती, पद्मावती देवीची मूर्ती आणि श्री दत्तात्रेयाची मूर्ती अशा ३ मूर्त्या आहेत. भुयारात बॅटरी घेऊन जाणे आवश्यकच आहे. पावसाळ्यात भुयारात उतरणे धोक्याचे आहे. हे भुयार पाहून परत पहिल्या दरवाजापाशी यावे. येथून वर जाणाई पायऱ्यांची वाट आपल्याला दुसऱ्या पूर्वाभिमुख दरवाजापाशी घेऊन जाते. या वाटेने गडावर प्रवेश करून समोरच हनुमान मंदिरातील हनुमानाचे दर्शन घेता येते. डावीकडे गेल्यावर एक बामणघर लागते. या घरात सध्या एक साधू तपश्चर्येसाठी बसतो. बामणघराच्या समोरच कल्याणस्वामीची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेऊन पुढे निघावे. वाटेतच श्री गणेशाचे पडीक मंदिर व एक मोठे तळे लगते. थोडेसे अंतर चालून गेल्यावर गडावरील वाड्यांचे अवशेष दिसतात. या वाटेने १० मिनिटे पुढे गेल्यावर गडाच्या पूर्व टोकापाशी आपण पोहचतो या टोकावरून समोरच जरंडा, अजिंक्यतारा, यवतेश्वर, चंदनवंदन, मोऱ्या, वैराटगड ही टिकाणे दिसतात. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो.
गडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्यास एकच वाट आहे. ही वाट पायथ्याच्या नांदगिरी (धुमाळवाडी) गावातून वर येते. सातारा एस.टी स्थानकावरून सातारा रोडला जाणारी गाडी पकडावी. सातारारोड ते नांदगिरी हे ३ कि.मी.चे अंतर आहे. येथून किन्हईकडे जाणारी बस पकडावी किंवा एकदम सातारा ते किन्हई बसने नांदगिरीला उतरावे. गावातून गडावर जाण्यास ४५ मिनिटे लागतात. वाटेतच एक गुहा लागते.
गडावरील हनुमान मंदिरात किंवा बामणघरासमोरील आवारात ५ ते ७ जणांची रहाण्याची सोय होते. जेवणाची सर्व व्यवस्था आपण स्वतःच करावी. पार्श्वनाथांच्या भुयारातील पाणी पिण्यासाठी बारामही साठा उपलब्ध असते. गडावर जाण्यासाठी साधारण ४५ मिनिटे (पायथ्यापासून) लागतात.

Monday, 11 July 2016

सज्जनगड किल्ला

सज्जनगड किल्ला Sajjangad Fort – ३३५० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. समरथ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती प्रत्येकाने भाळी लावावी. अनंत कवींनी या पावन भूमीचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे. “सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मांदार श्रुंगापरी । नामे सज्जन जो नृपे वसविला,श्री उर्वशीचे तिरी । साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी। येथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी ॥” सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा कि.मी. अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे.
इतिहास : प्राचीन काली या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ म्हणू लागले. या शब्दात अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते. म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधीले जायचे. चवथा बहमनी राजा महंमदशहा ( १३५८- १३७५ ) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हा किल्ला बहमनी राज्याचे वारसदार आदिलशहा कडे गेला. इ.स. १६६२ पर्यंत फाजलखान ह्या किल्ल्याच किल्लेदार असल्याचा उल्लेख आढळतो. २ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले सज्जनगड. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्ज्नगडावर समर्थांच्या दर्शनास आले.
पुढे ३-११-१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३-१२-१६७८ रोजी संभाजी महाराज सज्ज्नगडावरून पळून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तीचे गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थांचे निधन झाले. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले असले तरी गडाची व्यवस्था भानजी वरामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. पुढे यांत भांडणतंटा सुरू झाला. ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी २-६-१६८२ रोजी सज्जनगडाचा मुद्राधारी जिजोती काटकर ह्याला पत्र लिहिले की. “श्री स्वामी अवतार पूर्ण करण्याअगोदरच आज्ञा केली होती…. ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्य लोभास्तव भानजी व रामजी गोसावी यांसी कटकट करितात, तुम्ही उद्धव गोसावी यांसी पत्रे व वस्त्रे भानजी व रामजी यांजकडून देवविली म्हणून केलो आले. तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उद्धव गोसावी यांसी कटकट रावया गरज काये या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उधव गोसावी यांचे आधीन करविले असेली ती मागते भानजी व रामजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे. श्री स्वामींचे पहिलीच आज्ञा नाही. श्री स्वामींच्या समुदायांशी काडीइतके अंतर पडो न देणे… या पत्राप्रमाणे राहाटी करणे.” या नंतर पुढे २१ एप्रिल१७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्ज्नगडास वेढा घातला. ६ जून१७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ‘नौरससातारा’ म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला ‘छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ असे म्हणतात. हे द्वार अग्नेय दिशेस आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ‘समर्थद्वार’ असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो. त्याचा मराठीअर्थ खालील प्रमाणे १. ऐश्वर्य तुझा दारातून तोंड दाखवत आहे. २. हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे. ३. तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहे. ४. तुझ्या पासून सर्व विवंचना दुर होतात. ५. परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयारझाला. आदिलशहा रेहान याने काम केले. ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाटा उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या माघच्या बाजूस एक मशिदवजा इमारत आहे तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली. मंदिरा समोरच ध्वजस्तंभ आहे. नंतर आल्यामार्गाने पुन्हा तळ्यापाशी यावे व सरळ पुढे चालत जावे वाटेतच उपहारगृह श्री समर्थ कार्यालय आणि धर्मशाळा लागतात. धर्मशाळेच्या समोरच सोनाळे तळे आहे. याच तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. तळ्याच्या मागील बाजूस पुष्पवाटीका आहे.सोनाळे तळ्याच्या समोरून जाणारी वाट पकडावी आणि आपण मंदिराच्या आवारात येऊन पोहचतो. समोरच पेठेतल्या मारुतीचे मंदिर आहे तर बाजूला श्रीधर कुटी नावाचा आश्रम आहे. उजवीकडे श्रीरामाचे मंदिर, समर्थाचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवल्या आहेत. हे सर्व पाहून झाले की मंदिराच्या पुढच्या द्वारातून बाहेर पडायचे आणि डावीकडे वळावे. प्रथम ‘ब्रह्मपिसा’ मंदिर लागते आणि पुढे गेल्यावर धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. समोरच किल्ल्याचा तट आहे येथून सभोवतालचा परिसर पारच सुंदर दिसतो. गडा फिरण्यास दोन तास पुरतात.
गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.
परळीपासून : सातारा ते परळी अंतर १० कि.मी. चे आहे. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण ७८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो.गजवाडी पासून : सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ कि.मी. वर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायऱ्यानंतर दरवाजा लागतो. रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.
गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फे खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्ज्नगड (सेवा मंडळाच्या) खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.
जेवणाची सोय : गडावर जेवण्याची सोय होते. बारामही पिण्याचे पाणी आहे. गडावर जाण्यासाठी परळी गावातून पायऱ्यांनी १ तास व गाडीमार्गे १५ मिनिटे लागतात.

राजमाची किल्ला - Rajmachi Fort



राजमाची किल्ला Rajmachi Fort – हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. येथे जाण्यासाठी लोणावळ्याहून तुंगार्ली गावात जावे नंतर थोड्या चढणीनंतर तुंगार्ली धरणाच्या समोरुन ठाकर वस्तीवरून खाली उतरल्यावर सुमारे १८ किलोमीटर चालल्यावर राजमाचीच्या पायथ्याजवळ जाता येते. पायथ्याला उधेवाडी गांव असून गावातील घरांमध्ये रहाण्याची सोय होते. गडावर थोडीशी तटबंदी बुरुज व इमारतींचे जमीनदोस्त अवशेष दिसतात. किल्ल्याच्या वाटेवरुन जाताना एका बाजुला पावसाळ्यात उल्हास नदीच्या खोऱ्यात घनदाट झाडी प्रचंड धबधबे, उसळणारे ढग, अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती हे दृश्य अतिशय सुंदर, रमणीय आनंददायी आहे.

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणाऱ्या डोंगररांगमुळे निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. याच ‘उल्हास नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी. अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाटामार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा नाणेघाट तसा बोरघाट, त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ले राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामुळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्ट्या एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याचा दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.
इतिहास : राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे. यालाच ‘कोडांणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून आग्नेयेस २ कि.मी. अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवाटीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मीती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षांपूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणाचा दरवाजा’ संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवजाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटवरील राजमाची, लोहगड, तुंग,तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाकल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीने वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होनी आंग्रे यांना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६ मध्ये सदाशिवराव तोतयाने संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि बाजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळएका मोठ्या दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थानिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भा महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड’ म्हणतात या कुंडात लोक मोठ्य श्रद्धेने सूर्यस्नान करतात.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योद्ध्याचे स्मारक, अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, गणपति आणि मारुतिरायाची मूर्ती आहे. किल्लावरून, आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला ‘उधेवाडी’ असे म्हणतात.
उदयसागर तलाव : पावसाळ्यात हा किल्ला मात्र ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळ्यात दरीतून पडणाऱ्या धबधब्याचे सुंद्र दृष्य दिसते. हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोळसाणारा पाऊस या अल्हाददायक वातावरणामुळे मनोन्मनी कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतात. ‘पलिकडे खळाळे इर्मळ निळसर पाणि उतुंग तरुंची उभी सभोती श्रेणी एकाकी धूसर पाऊलवाट मधे ही तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी.
मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. मनरंजनवर जाणारी वाट सोपी आहे. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. किल्ल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातीलकिल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.
श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यापैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते. दरवाजाची कमान बऱ्यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोट्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो.
शंकराचे मंदिर : तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या टाक्यांमध्ये पडते. सध्या या मंदिराच्या उत्खननाचे काम गावकऱ्यांनी हाती घेतलेले आहे. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती ‘कातळदरा’ या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला ‘भैरव डोंगर’ म्हणतात. अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखलपट्टी आहे. यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे.
गडावर जाण्याच्या वाटा :
लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे : लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात यावे. ही वाट १९ कि.मी. ची आहे. वाटेने किल्लावर जाण्यास पाच तास लागतात.
कर्जतहून कोंदीवडे मार्गे : कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने यावे. इथून गडावर जाण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात.
उधेवाडी गावात राहण्याची सोय उत्तम होते. भैरवनाथाच्या मंदिरातही आणि बालेकिल्ल्यावर जातांना लागणाया गुहेतही राहाता येते. राजमाची रुलर एड एन्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेने बांधलेल्या खोल्यांमध्येही रहाण्याची व्यवस्था होते. राजमाची गावात जेवणाची उत्तम सोय होते. राजमाची गावात पाण्याची सोय होते. गडावर जाण्यासाठी तुंगार्ली मार्गे ५ तास, कर्जत-कोदिंवडे मार्गे २ तास लागतात.