Tuesday 17 May 2016

 मालवण देवबागचं अनोखं 'त्सुनामी आयलंड .. निसर्गाचा एक
गूढ चमत्कार
हे बेट जगभरातून सिंधुदुर्गात दाखल होणा-या पर्यटकांचे आकर्षण ठरले
आहे
'त्सुनामी आयलंड' हा एक निसर्गाचा चमत्कार आहे.. या
बेटाच्या निर्मितीमागे काही शास्त्रीय
कारणं आहेत .या आयलंडला देवबागच्या किनाऱ्यावरून बोटीने
जावं लागतं.. या सोयी उत्तम व
किफायतशीरही आहेत.. हा आयलंड तसा फार
पूर्वीपासून या ठिकाणी आहे.. स्थानिक लोक या
बेटाला 'भाट' असं म्हणायचे.
सध्या पर्यटकांच्या उपस्थितीने त्सुनामी आयलंड
फुलले असून दिवसागणिक सरासरी २५ हजार पर्यटक
त्सुनामी आयलंडला भेट देतात. या ठिकाणाला मिळणा-या वाढत्या
प्रतिसादामुळे देवबाग गावाने मालवण, तारकर्लीसारख्या प्रसिद्ध
ठिकाणांनाही मागे टाकण्यास सुरुवात केली आहे.
समुद्राच्या लाटांद्वारे आलेल्या वाळूच्या बेटात देवबाग गाव वसलेले असून
एकीकडे कर्ली खाडी व
दुसरीकडे अरबी समुद्र अशी या
गावाची रचना आहे. देवबाग गावातील या सौंदर्याने
जगभरातून येणा-या पर्यटकांना भुरळ घातली.
येथील त्सुनामी आयलंड बेटावर पर्यटकांना
आकर्षित करणा-या वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग, पॅरासिलिंग अशा पर्यटन सुविधा सुरू
केल्या आहेत. त्यामुळे त्सुनामी आयलंडला पर्यटनाच्या
दृष्टीने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे या आयलंडला
देवबागच्या किनाऱ्यावरून बोटीने जावं लागतं.. या सोयी
उत्तम व किफायतशीरही आहेत.. हा आयलंड
तसा फार पूर्वीपासून या ठिकाणी आहे
हे आयलंड सभोवार पाणी आणि मध्येच जमीन
अशा नेहेमीच्या प्रकारापेक्षा थोडं वेगळं आहे.. इथं सभोवार
पाणी आणि मध्येही पाणीच असा
काहीसा प्रकार आहे..'त्सुनामी आयलंड' हा एक
निसर्गाचा चमत्कार आहे..सभोवतालच्या पाण्याचा ड्राफ्ट
(खोली) २० फुटांचा असेल तर आयलंडवरच्या
पाण्याची खोली ओहोटीच्या वेळेस
जेमतेम दोन-तीन फूट तर भरतीच्या वेळेस चार-
पाच फूट असते.. म्हणजे ऐन भरतीच्या वेळेस या
ठिकाणी गेलो असता समोरून पाहीलं असता माणूस
भर समुद्रात (खरंतर ही खाडी आहे) पाण्यात
गुडघाभर पाण्यातच उभा आहे असंच दिसतं.. इथं संध्याकाळनंतर
कोणालाही थांबता येत नाही..


No comments:

Post a Comment