Monday, 27 June 2016

धोदवणे तिवरे धबधबा

धोदवणे तिवरे धबधबा:-
संगमेश्वर परिसरातील हे आणखी एक देण्याजोगे ठिकाण. सर्व वयातील पर्यटकांना आकर्षित करणारा असा हा एक धबधबा या ठिकाणी आहे. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा बाराही महिने वाहत असतो. तसेच तो सुमारे 200 फूट उंचावरून खाली झेपावत असतो. हा धबधबा धोदवणे तिवरे या ठिकाणी आहे व तेथे संगमेश्वरहुन जाता येते. ह्या धबधब्याशिवाय या ठिकाणीचे आणखी एक आकर्षण म्हणजे या ठिकाणी असणारा धामणकोंड डोह. हा धामणकोंड डोहदेखील पाहण्यासारखा आहे. या ठिकाणीदेखील आंघोळीसाठी धबधब्याखाली जाताना तसेच डोहामध्ये पोहायला उतरताना स्थानिक व्यक्तींकडून योग्य ती माहिती घेऊनच जावे. कारण उत्साहाच्या भरात पर्यटकांकडुन एखादी चुक होण्याची शक्यता असते म्हणूनच ही धोक्याची सुचना दिली आहे.

No comments:

Post a Comment